रामेश्वर मंदिरात रांगोळी काढलेल्या व्यक्तींचा भेटवस्तू देवून सत्कार
वेंगुर्ला प्रतिनिधी- आषाढ महिन्यात वेंगुर्ला येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह संपन्न झाला. या सप्ताह कालावधीत मंदिरात स्थानिक रांगोळी कलाकारांनी आपल्या रांगोळी घातल्या होत्या, त्या कलाकारांचा १५ ऑगस्ट रोजी रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
