भुईबावडा रींगेवाडी येथून ८४ वर्षीय महिला बेपत्ता

वैभववाडी प्रतिनिधी
भुईबावडा रिंगेवाडी येथील श्रीमती भागीर्थी महादेव देसाई वय ८४ या वृध्द महिला नापत्ता झाल्या आहेत. त्यांचा मुलगा रवींद्र देसाई यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
श्रीमती भागीर्थी देसाई या दिनांक १९ आॕगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. सुमारास भुईबावडा पाटीलवाडी येथे माहेरी जाते असे सांगून घरातून गेल्या. माञ त्या भुईबावडा पाटीलवाडी येथे पोहचल्याच नाहीत. त्यांची सर्वञ शोधाशोध करुनही सापडल्या नाहीत. त्यामुळे वैभववाडी पोलिस ठाणेत नापत्ता असलेची तक्रार देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page