भाजप प्रवक्ते संजू परब यांची माहिती
सावंतवाडी,ता.२१: आंबोली गेळे व चौकुळ भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी आपण संबंधित गावातील गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे. उद्यापासून गाठीभेटी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे दिली. याबाबतच्या सुचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसार हा गाठीभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
