मंत्री दीपक केसरकर;अर्बन बँक टिकविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचेही केले आवाहन
सावंतवाडी दि.२१ ऑगस्ट (प्रतिनिधी) सावंतवाडी अर्बन बँक ही शहराचे वैभव आहे, हे वैभव टिकण्यासाठी संचालक आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन शालेय शिक्षण, पर्यावरण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. आर्थिक दृष्ट्या बँक हा विकासाचा महत्त्वाचा कणा आहे असे ते म्हणाले.
सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष अँड सुभाष पणदूरकर यांनी केसरकर यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. अर्बन बँकेचे आधारस्तंभ केसरकर आहेत असे बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक गोविंद वाडकर, रमेश बोंद्रे, अशोक दळवी,नरेंद्र देशपांडे, बाळ बोर्डेकर, वाय पी नाईक, अपर्णा कोठावळे, तसेच बँक संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडी अर्बन बँकेची उभारणी आणि प्रगतीसाठी अनेकांचे योगदान लाभले आहे. त्याची जाणीव ठेवून संचालक मंडळ कर्मचारी वर्ग ग्राहक आणि हितचिंतकांनी अर्बन बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलावा आर्थिक दृष्ट्या अर्बन बँक ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने हिताची बदली पाहिजे या दृष्टीने देखील प्रयत्न करावेत बँकेच्या प्रगतीसाठी आपण सतत सहकार्य करत आलो आहोत आणि यापुढेही आपले योगदान बँकेसाठी असेल असे त्यांनी म्हटले.
यावेळी अर्बन बँकेचे संचालक गोविंद वाडकर यांनी प्रास्ताविकामध्ये केसरकर यांच्या कामाचे कौतुक केले तर अध्यक्ष अँड सुभाष पणदूरकर यांनी दीपक केसरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो
सावंतवाडी अर्बन बँकेचे आधारस्तंभ शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा सत्कार करताना अध्यक्ष अँड सुभाष पणदूरकर शेजारी गोविंद वाडकर, अशोक दळवी, रमेश बोंद्रे व अन्य
