वेंगुर्ला प्रतिनिधी- आषाढ महिन्यात वेंगुर्ला येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह संपन्न झाला. या सप्ताह कालावधीत मंदिरात स्थानिक रांगोळी कलाकारांनी आपल्या रांगोळी घातल्या होत्या, त्या कलाकारांचा १५ ऑगस्ट रोजी रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये हर्षाली सावंत, विलास साळगांवकर, सारिका सावंत, पल्लवी सावंत, तेजस्वी सावंत, अजय खानोलकर, अमृता खानोलकर, अनिश खानोलकर, निकिता देशमुख, प्रज्वल कोयंडे, सायली सावंत, प्रेमानंद जाधव, प्रकाश शिरगांवकर, चतूर पार्सेकर, मंदार भगत, मकरंद मांजरेकर, संकेत हळदणकर व हेमंत कोळसुलकर यांचा समावेश होता. तर ५० वर्षे अखंड रांगोळी घालणारे रमेश नरसुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड.अजित भणगे, चित्रकार सुनिल नांदोसकर, अॅड.श्याम गोडकर, ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रविद्र परब, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅड.श्रीनिवास नाइर्दक, महादेव मेस्त्री व निखिल घोटगे उपस्थित होते.
