⚡वेंगुर्ला ता.२२-: मठ येथील ओेम स्वयंभू सेवा मंडळाचा वर्धापनदिन व बक्षिस वितरण कार्यक्रम मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश मोबारकर, माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे व सैनिकी कमांडो प्रशिक्षक (बेळगांव) प्रभाकर मठकर यांच्या उपस्थितीत ३१ जुलै रोजी स्वयंभू मंगल कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी खानोलकर हायस्कूलमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला कुणाल नाईक व इतर १७ जणांना रोख पारितोषिके तसेच मठ गावातील तिन्ही मराठी शाळांमध्ये इयत्ता सातवीमध्ये पास झालेल्या प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिके देण्यात आली. सभासद पाल्यांमधून सन २०२१-२२ या वर्षात विशेष प्राविण्याने पास झालेले निनाद अणसूरकर, श्रेया बोवलेकर, मिहिर खानोलकर यांनाही रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्रीमती माधवी मधुसूदन मराठे यांनी
मठ हायस्कूलमधून गणित व इंग्रजी या विषयात प्रथम आलेले कुणाल नाईक व मेघस्वी भगत यांना श्रीमती माधवी मधुसूदन मराठे यांनी ठेवलेल्या देणगीतून त्यांच्या स्मरणार्थ बक्षिसे देण्यात आली.
मठ गावातील तरुण पिढीला सक्षम बनविण्यासाठी मंडळाचे प्रयत्न असल्याचे विद्याधर कडुलकर यांनी सांगितले. एस.एस.काळे यांनी स्वावलंबन, दूरदर्शीपणा व मोबाईल संस्कृतीबाबत जागरुकता यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान आपला झालेला सत्कार आपण विसरणार नसल्याचे प्रभाकर मठकर यांनी सांगितले. मंडळाचे कार्य निरंतर सुरु रहावे अशी सदिच्छा सरपंच तुळशीदास ठाकूर यांनी व्यक्त केली. नविन पिढीला घडविताना त्यांना कशाप्रकारे सक्षम करता येईल याची काळजी मंडळ घेत असल्याबद्दल काजू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी मंडळाचे कौतुक केले. रविद्र खानोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे हे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याची ग्वाही गोपाळ अणसूरकर यांनी दिली.
