मालवणात तेली समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

⚡मालवण ता.२१-:
तेली समाज उन्नती मंडळ मालवणचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा मालवण भरड येथील हॉटेल लीलांजली हॉल येथे संपन्न झाला. यावेळी तेली समाजातील विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

उद्योजक सचिन आंबेरकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी मंडळाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन आचरेकर, उपाध्यक्ष सदाशिव आरोलकर, सचिव मंगेश शेर्लेकर, सहसचिव उदय पाटकर, सदस्य दिनेश डीचवलकर, गणेश नेरुरकर, शमिका वाडकर, मयुरी वेंगुर्लेकर, भाग्यश्री डीचवलकर, काशिनाथ पेडणेकर, विनायक आरोलकर, राघोबा मीठबावकर, मंडळाचे संस्थापक सदस्य दशरथ कवटकर, बापू तळवडेकर, बाबा आरोलकर, माजी सचिव अशोक ओटवणेकर, सुभाष पाटकर, सौ. नंदा कोचरेकर, राजकुमार मुणगेकर, अमित मुळदेकर, दिनकर सातार्डेकर, श्रीकृष्ण वालावलकर, रमाकांत शेट्ये आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायत्री आरोलकर व मृण्मयी आरोलकर यांच्या नांदीने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी आयुषी आरोलकर हिने गीत सादर केले. सचिव मंगेश शेर्लेकर यांनी प्रास्ताविक करत मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर महेश फोंडेकर दाम्पत्य, रिक्षा चालक सदाशिव आरोलकर, आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर, तेल घाण्याचे व्यावसायिक रमाकांत पेडणेकर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ग्रा. प. सदस्य गणेश नेरुरकर, शमिका वाडकर, भाग्यश्री डीचवलकर यांच्यासह मंडळाचे संस्थापक सदस्य व २००५ पासून मंडळाच्या कार्यकारिणीत काम केलेल्या २० सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी यारसी पेडणेकर या विद्यार्थिनीला १५ हजार रुपयांची शैक्षणिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजन आचरेकर व बाबा आरोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव आरोलकर व उदय पाटकर यांनी केले.

You cannot copy content of this page