अरविंद चव्हाण यांचे निधन
⚡मालवण ता.२४-: मालवण मालवण बाजारपेठ येथील रहिवासी तथा मनोज हेअर कटींग सलूनचे मालक अरविंद बाली चव्हाण (७९) यांचे मंगळवारी रात्री ९.४५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर रात्री उशीरा बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अरविंद चव्हाण यांना मालवण तालुका नाभिक बांधव संघटनेच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता….
