विरोधी नगरसेवकांकडूनही गणेशोत्सव नियोजनाची पाहणी

⚡कणकवली ता.२४-:
गणेशोत्सवासाठी कणकवली शहरात न. प. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी विरोधी
गटाचे नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजीत जाधव, उपशहर प्रमुख वैभव मालंडकर,अनिल हळदिवे यांनी केली. त्यांनी भाजी, फुल, फळ विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांशी संवाद साधून प्रश्न व अचडणी जाणून घेतल्या. उड्डाणपुलाखालील जागेत भाजी, फळ, फुल विक्रेत्यांना व्यापार करण्यास न. पं. ने जागा उपलब्ध करून दिली आहे. जागेव्यतिरिक्त अन्य जागेत जर कोणी व्यवसाय करेल, तर त्याच्यावर न. पं. प्रशासनाने कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली कैफियत विरोधी गटाच्या नगरसेवकांकडे मांडल्या.

You cannot copy content of this page