Headlines

कुडाळ न.पं. तर्फे एकल महिलांसाठी व्यवसाय अनुदान योजना जाहीर

४ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील पात्र एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने व्यवसाय अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र महिलांसाठी अर्ज कुडाळ नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
इच्छुक महिलांनी नगरपंचायत कार्यालयातून अर्ज प्राप्त करून, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून ४ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यालयात सादर करावेत. योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सविस्तर माहितीही नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
तरी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त पात्र एकल महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page