वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील रहिवासी पत्रकार अजय अशोक गडेकर यांच्या जुन्या घरानजिक असलेल्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री चक्क बिबट्या विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली.
त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झाडावरील कोंबडीच्या भक्ष्यासाठी आलेल्या बिबट्याचा लगतच्या विहिरीत पडून पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. याबाबत वनविभाग नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील, वेंगुर्ला वनपाल संदिप हजारे, मठ वनरक्षक प्रवीण कमळकर, तुळस वनरक्षक ब्रम्हकुमार भोजने, वेंगुर्ला – कुडाळ – मालवण आरआरटी टीमचे बांबर्डेकर, मेस्त्री, गावडे व अन्य पथक त्वरित दाखल झाले. त्यानंतर सकाळी मालवण येथील स्कुबा डायव्हिंगद्वारे सदर बिबट्या ग्रामस्थ व वनविभागाच्या पथकाने विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून शवविच्छेदन करण्यात येणार असुन पुढील प्रक्रिया होणार आहे. यावेळी सावंतवाडी सहाय्यक वनसंरक्षक श्री. लाड उपस्थित होते. दरम्यान घटनास्थळी माजी पं. स. सदस्य भाऊ गडेकर, बाबा गडेकर, अशोक गडेकर, दिपक गडेकर, माजी सरपंच प्रकाश गडेकर, तेजस शेणई, समिर गडेकर, सुनिल गडेकर, चेतन गडेकर, गौरव गडेकर, प्रविण गडेकर, अमेय सुकळवाडकर,आबा परब, उज्वल गडेकर, सागर कासले, स्वप्नील गडेकर, चंद्रशेखर कुडाळकर, काकू नाईक, प्रशांत पार्सेकर, समिर पेडणेकर, आप्पा सुकळवाडकर, प्रमोद सुकळवाडकर, दामले, तसेच नजिकच्या वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मुख्य लोकवस्तीनजिक येऊन बिबट्या पोहचल्याने वनविभागाने अन्य कार्यक्षेत्रात तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

