Headlines

दाभोसवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा येथील शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर सुमारे १८ फुट उंचीची गणेश मूर्ती साकारण्यात आली असून यानिमित्त १८ आणि १९ नोव्हेंबर या कालावधीत दशावतारी नाटक तसेच महिलांसाठी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. १८ रोजी रात्री ९ वाजता श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग तर गुरुवार दि. १९ रोजी रात्री ९ वाजता महिलांसाठी “खेळ शौर्याचा सन्मान महिलांचा” आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी रसिक प्रेक्षकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page