Headlines

कुडाळमध्ये भरदिवसा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला ; संशयिताला पकडले…

महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक :नागरिकांच्या सतर्कतेमुळे लाखोंची रोकड सुरक्षित..

⚡कुडाळ ता.१७-: कुडाळ शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून बँकेतील लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बँक कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला.

मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारात एका तरुणाने बँकेत प्रवेश करून महिला कर्मचाऱ्याला चाकू दाखवत रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्याला रोखले. यावेळी संतप्त नागरिकांनी संशयिताला पकडून चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

You cannot copy content of this page