Headlines

निरवडेतील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ….

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन; सरपंच सुहानी गावडे यांच्याकडून आमदार दीपक केसरकर, संजू परब यांचे आभार..

सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा भूमिपूजन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या रस्त्यांच्या कामांमुळे गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामांमध्ये सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते निरवडे पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी तसेच भाईडवाडी ते शेटकरवाडी या चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचा समावेश आहे. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली ही कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी निरवडेच्या सरपंच सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, धर्मा माळकर, नारायण माळकर, बाळ्या बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना युवा नेते सूरज परब यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे गावातील महत्त्वाची विकासकामे मार्गी लागत असून भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असेच सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page