माजी खासदार सुधीर सावंत यांचे शिंदे गटाला सर्मथन

केसरकर यांच्याकडून स्वागत: मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सावंतवाडी : माजी खासदार सुधीर सावंत यांनी बुधवारी शिंदे गटाला सर्मथन दिले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री दिपक केसरकर व उदय सामंत यांच्या सोबत पक्ष वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत माजी सैनिकाबाबत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन घेतले.त्यानंतर केसरकर यांनी सावंत यांचे स्वागत केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,गणेशप्रसाद गवस,शैलेश दळवी,सचिन वालावलकर,योगेश तेली,बबलू पांगम,विनायक शेट्वे,ओंकार परयेकर,ज्ञानेश्वर शेटवे उपस्थित होते.

You cannot copy content of this page