⚡मालवण ता.२४-: मालवण मालवण बाजारपेठ येथील रहिवासी तथा मनोज हेअर कटींग सलूनचे मालक अरविंद बाली चव्हाण (७९) यांचे मंगळवारी रात्री ९.४५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर रात्री उशीरा बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
अरविंद चव्हाण यांना मालवण तालुका नाभिक बांधव संघटनेच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता. पुरस्कार वितरणप्रसंगी त्यांनी श्री संतसेना महाराज यांच्या पेहराव्यात शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी होवून आपली सेवा बजावली होती. नाभिक समाज बांधवांच्या संघटीतपणासाठी आणि समाजाच्या हितासाठी चव्हाण यांनी योगदान दिले होते. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच ते आजमितीपर्यंत कार्यरत होते. मालवण शहरातील श्री देवी भैरवी मंदिराच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भरड दत्त मंदिर येथील काकडा आरतीचे ते जुने भाविक होते. पहाटे चार वाजता उठून काकडा आरतीसाठी जुन्या काळात ते मंदिरात पोहचून त्याठिकाणी मिळेल ती सेवा करत असत. दत्त महाराजांवर त्यांची निस्सीम श्रद्धा होती.
मालवण मधील पत्रकार मनोज चव्हाण, आबली उर्फ राजू चव्हाण, प्रसिद्ध दशावतारी कलाकार महादेव उर्फ गोट्या चव्हाण, पिंगुळी येथील सौ. समिक्षा सतीश पिंगुळकर यांचे ते वडील होत. पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
