दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वर साधना डिगस भजन मंडळ प्रथम

⚡मालवण ता.२४-:
घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर येथे श्रावण मास निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची श्रावणधारा भजन स्पर्धेत स्वर साधना डिगस भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या भजन मंडळांना माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले

घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर येथे श्रावण मास निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची श्रावणधारा भजन स्पर्धा १३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे

या स्पर्धेत स्वर साधना डिगस भजन मंडळ प्रथम, रवळनाथ पिंगुळी द्वितीय तर गांगेश्वर श्रावण तृतीय क्रमांक यांच्यासह अन्य सन्मानप्राप्त भजन मंडळाना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्वर साधना डिगस भजन मंडळास ११,१११ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तर स्पर्धेत द्वितीय क्रमांक रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी यांनी ७,७७७ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तर तृतीय क्रमांक गांगेश्वर भजन मंडळ श्रावण यांना ५,५५५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम (सद्गुरु वडखोल) ३,३३३ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, द्वितीय (भगवती बाब) २,२२२ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, तृतीय (दत्ताकृपा वैभववाडी) १,१११ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, विशेष उल्लेखनीय संघ (प्राथमिक शिक्षक संघ कुडाळ) यासह सर्वोत्कृष्ट गायक, मृदुंगमणी, झांज वादक, कोरस यासह १५ पारितोषिके दत्ता सामंत यांनी पुरस्कृत केली होती. कै. रत्नाकर हरी बिरमोळे व कै. बुवा भूषण देसाई यांच्या स्मरणार्थ वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली होती. निलेश राणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी निलेश राणे, दत्ता सामंत यांच्यासह मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजू केनवडेकर, भजन सम्राट भालचंद्र केळुसकर, गजानन देसाई, राजेन्द्र प्रभू, राजा गावडे, पूजा करलकर, संतोष कोदे, मंदार लुडबे, जेरॉन फर्नांडिस, सरपंच दिलीप बिरमोळे, बाळा माने, मधुकर चव्हाण, बाळू कुबल, सुशांत घाडीगांवकर, भाऊ सामंत, राजू परुळेकर, देवेंद्र नाईक, आबा हडकर, प्रशांत बिरमोळे, दया देसाई, निवेदक राजा सामंत यासह अन्य मान्यवर व भजन प्रेमी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी परीक्षक भालचंद्र केळुसकर यांनी भजन स्पर्धेची विश्लेषणात्मक मांडणी उपस्थितांसमोर मांडली. तर बाळू कुबल यांनीही स्पर्धा आयोजनाचे विशेष कौतुक केले.

फोटो :

दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील विजेत्या स्वर साधना डिगस भजन मंडळाला भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

You cannot copy content of this page