राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने दिला इशारा
⚡कणकवली ता.२४-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची भरमसाठ लूटमार होत असून सामान्य जनता हैराण झाली आहे.महावितरण अन्यायकारक कर आकारणी करून जनतेच्या माथी जादा वीजबिल मारून करत असलेली लूट तात्काळ थांबवावी, नपेक्षा भविष्यात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाभरात वीज ग्राहकांना सोबत घेऊन धडक आंदोलन करण्यात येईल असा राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणला देण्यात आला.
राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर यांच्या उपस्थितीत महावितरनच्या अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने कणकवली येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यकारी अभियंता श्री. भगत यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर,राष्ट्रवादी माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण समिति जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अनीस नाईक राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर,गणेश चौगुले,राष्ट्रवादी माजी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर शिवडाव माजी उपसरपंच सतीश पाताड़े, सचिन सदडेकर, राजू वर्दम आदि उपस्थित होते
सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाढीव वीज बिलामुळे जनता मेटाकुटीला आली असून महावितरणकडून प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दाचा खेळ करून एकाच अर्थाचे अनेक शब्द (इंधन समायोजन वहन आकार वीज शुल्क, स्थिर आकार) तयार करून विविध आकाराचा अन्यायकारक बिलात समावेश करून वीज ग्राहकांकडून दर महिन्याला करोड़ो रूपयांची भ्रष्ट मार्गाने लूट करत असून राज्यकर्ते मात्र यावर बोलत नाहीत. जनतेचे कैवारी म्हणणारे राज्यकर्ते महावितरणचे बंटिक झाले असून सामान्य जनता बीज बिलांच्या जाचक जिझीया करातून मुक्तता मिळवण्यासाठी धडपडत आहे. आज सामान्य जनता वाढलेल्या जाचक बिलातून सुटका करून घेण्यासाठी एकवेळ पूर्वीप्रमाणेच दिवा बत्तीच्या शोधात आहे मात्र पूर्वी मिळणारे केरोसीन सुद्धा शासनाने बंद केले आहे, त्यामुळेच महावितरण वीज ग्राहकांवर अन्यायकारक वीज बीले माथी मारत जनतेची मोठ्या प्रमाणात महालुट करून आर्थिक भ्रष्टाचार करत आहे. आणि वीजग्राहकांना अन्य पर्याय नसल्याने अन्यायकारक वाढीव बीले स्विकारण्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर महावितरणचे भ्रष्ट दुकान केव्हाच जनतेने बंद केले असले,
पण सतत भरमसाठ बिलात वाढ होत असल्याने ग्राहक हैराण झाले असून महावितरणच्या विरोधात आता वीज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेऊन आपल्यावर होणान्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेपर्यंत येत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हयात वातावरण तयार होत आहे,
अन्याय कारक वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना लूट थांबवावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस महावितरणला इशारा देत असल्याचे सांगण्यात आले.
