Headlines

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्हानिहाय शासकीय वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात बांधकरवाडी, कणकवली येथे इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले असून या शासकीय  वसतीगृहात प्रवेश घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. 
या वसतीगृहामध्ये सन 2026-27 साठी इतर मागास वर्गासाठी  31 टक्के आरक्षण असून व्यवसायिक अभ्यासक्र 22 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम 9 रिक्त जागा, प्रवर्ग निहाय व्यवसायिक अभ्यासक्र 12 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्र 9 रिक्त जागा आहेत. 
विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी  20 टक्के आरक्षण असून व्यवसायिक अभ्यासक्र 14 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम 6 रिक्त जागा, प्रवर्ग निहाय व्यवसायिक अभ्यासक्र 4 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्र 6 रिक्त जागा आहेत.
 विशेष मागास प्रवर्गासाठी 4 टक्के आरक्षण असून व्यवसायिक अभ्यासक्र 3 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम 1 रिक्त जागा, प्रवर्ग निहाय व्यवसायिक अभ्यासक्र 3 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा आहेत.
 दिव्यांगासाठी 2 टक्के आरक्षण असून व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम 1 रिक्त जागा, प्रवर्ग निहाय व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा आहेत. अनाथासाठी 1 टक्के आरक्षरण  असून व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा, प्रवर्ग निहाय व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा आहेत.
 आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) साठी 2 टक्के आरक्षण असून व्यवसायिक अभ्यासक्र 1 रिक्त जागा, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम 1 रिक्त जागा आहेत.
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहील. विद्यार्थ्याने संबंधित प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र तसेच वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसीलदार यांचेकडील उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व संबंधित प्रवर्गासाठी विहित आरक्षणानुसार वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी इयत्ता 12 वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे.
सन 2026-27 मध्ये बारावीनंतरच्या बी.ए., बी. कॉम., बी. एस्सी. तसेच पदवीनंतरच्या एम. ए., एम. एस्सी. यांसारख्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी दि. 7 ऑगस्ट 2026 ते दि. 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी hmasnew.mahait.org संकेतस्थळाला भेट द्या. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, बांधकरवाडी, कणकवली येथे जमा करणे आवश्यक आहे.

00000000

You cannot copy content of this page