एकाच रात्री सहा बंद घरांवर घरफोडीचा प्रयत्न…
खारेपाटण : कणकवली तालुक्यातील नडगीवे येथील धुरीभाटले वाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या वाडीत अनेक कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईत…
