जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्याकडून निवेदन सादर..
⚡बांदा ता.०९-:
इन्सुली घाट परिसरातील धोकादायक झाडे तातडीने हटवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल यांना निवेदन सादर केले आहे.
इन्सुली घाटात मुख्य रस्त्यालगत अनेक मोठी झाडे धोकादायक अवस्थेत उभी आहेत. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत एखादे झाड अचानक कोसळल्यास वाहनांवर पडून गंभीर अपघात होऊ शकतो, तसेच मानवी जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
राऊळ यांनी प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन धोकादायक झाडांची पाहणी करावी आणि आवश्यक ती झाडे त्वरित तोडून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी मान्सूनपूर्व काळात घाट परिसरात वादळी वारे व पावसाचा प्रभाव वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई तातडीची असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
फोटो –
वनविभागाला निवेदन सादर करताना जि. प. सदस्य नितीन राऊळ.
