Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी एसटी कामगार सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील ठाकरे एसटी कामगार सेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक ,शहर प्रमुख शैलेश गावंढळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायकल डिसोजा,श्रुतिका दळवी,भारती कासार

Read More

अवैध मायनिंगवर खनिकर्म विभागाने कारवाई करावी…

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली मागणी… ⚡ओरोस ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच बेकायदा मायनिंग सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यावर जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी विजय साळवे यांच्याकडे केली.रुपेश पावसकर यांनी आज जिल्हा खनिकर्म अधिकारी…

Read More

जिल्हा विकासासाठी प्रशासनाने सकारात्मक असावे…

रुपेश पावसकर:जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन नेहमीच शासनासोबत – जिल्हाधिकारी तावडे.. ⚡ओरोस ता.२३-: शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर यांनी आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रतिनिधी श्री. संतोष परब उपस्थित होते.चर्चे दरम्यान जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये प्रशासनाची सकारात्मक भूमिका गरजेची असून त्यातूनच प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील असे…

Read More

भजन क्षेत्र समृद्ध करण्यासाठी अशा वारकरी भजन स्पर्धा महत्त्वाच्या…

संतोष कानडे:साकेडीमध्ये जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२३- भजन क्षेत्रामध्ये नवीन पिढी फारशी रुळत नाही. मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक भजनांचे प्रकार समोर आणत असताना आम्ही चक्रीभजन प्रकार सुरू केला. जेणेकरून तरुणाई यामध्ये आकर्षित होईल. भजन क्षेत्र अजून समृद्ध करण्यासाठी आपला हातभार लावावा यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळा होत…

Read More

बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या शिवसैनिकांनी केली बाळासाहेबांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.२३-: हिंदुऋदय सम्राट के बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाळणे कोंड धरणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या पाच कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्या कल्पवृक्षाला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली.सुमारे दहा वर्षांपूर्वी बबन साळगावकर सावंतवाडी नगराध्यक्ष असताना त्यांनी पाळणे कोंड धरणावर शिवसेनाप्रमुख…

Read More

जंयती दिवशी बाळासाहेबांच्या फोटोवरचा हार न बदलणारे हे कसले शिवसैनिक, विचार पुढे नेणार…

चद्रकांत कासार ; कुवत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही बदलतो; मंत्री केसरकारांवर साधला निशाणा.. ⚡सावंतवाडी ता.२३-: हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो अशी वल्गना करणाऱ्या शिंदे शिवसेनेला बाळासाहेबांच्या जंयती दिवशी सावंतवाडी बस स्थानकात त्यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जुना झालेला हार बदलता येत नाही तर हे कसले शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन…

Read More

मोती तलावातील मासे पडले मृत्युमुखी…

हिरव्या तवंगामुळे प्रकार घडल्याचा अंदाज:तत्काळ साफसफाई करण्याची सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२३-: मोती तलावामध्ये असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पालिकेने त्वरित लक्ष देऊन ते साफ करावे, अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली. दरमयान गेल्या चार-पाच दिवसात मोती तलाव मध्ये माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले…

Read More

उपरलकर देवस्थान नजदीक दुचाकी व टेम्पोमध्ये अपघात…

केसरी येथील युवक जखमी: घटनास्थळी नागरिकांची धाव.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील उपरलकर नजदीक टेम्पो व दुचाकी मध्ये अपघात झाला असून यात केसरी येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली संबंधित युवकाला रुग्णालयात दाखल केले.

Read More

आंबोलीत ‘श्रीराम’ उत्सव मोठ्या उत्साहात…

आंबोली,ता.२२:अयोध्येतील श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आंबोली येथील दोन्ही राम मंदिरात रामाचा उत्सव साजरा करण्यात आला.माऊली मंदिरात ही राम प्रतिमेचा प्रतिष्ठापन सोहळा साजरा करण्यात आला. आंबोली बाजारवाडी येथील राम मंदिरात लघुरुद्र तसेच विविध धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला.श्री रामांच्या मूर्तीला अभिषेक तसेच विधिवत कार्य करण्यात आले. आंबोली राघवेश्वर येथील राम मंदिरात ही रामउत्सव साजरा करण्यात आला.तसेच…

Read More

सावंतवाडी तालुका बनला राममय, सर्वत्र रामनामाचा जयघोष…

रामभक्तांनी शहरासह गावागावात काढलेल्या मिरवणूकांना उदंड प्रतिसाद… ⚡सावंतवाडी ता.२२-: अयोद्धेतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गावागांवात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण तालुका राममय झाला होता. गावागावात विविध मंदिरांमध्ये सकाळी प्रभू श्रीरामांचे पूजन नामसंकीर्तन, महाआरती, महाप्रसादभजन, कीर्तन, फुगड्या असे विविध कार्यक्रम सादर झाले. तसेच काही ठिकाणी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह…

Read More
You cannot copy content of this page