सौ. नीलम.राणे ; आगामी काळात बचत गटांसाठी काम करू..
सावंतवाडी ता.०२-: कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन गेली 40 वर्ष राजकारणात काम करणाऱ्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशा विविध पदापर्यंत पोहोचवण्यामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यायाने कोकणाचा विकास नव्याने होण्यासाठी पुन्हा एकदा मतरुपी आशीर्वाद देऊन नारायण राणेंच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन सौ नीलम नारायण राणे यांनी आज येथे केले.
सावंतवाडी वैश्य भवन येथे आयोजित महायुतीच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिंदे शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख अँड. निता कविटकर,भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,अजित पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, अर्चना पांगम, अनारोजिन लोबो,
अन्नपूर्णा कोरगावर, संध्या तेरसे, भारती मोरे, अशोक दळवी,आदी उपस्थिथी होते.
