दिपक केसरकर ; राणे निवडून आल्यास विकासाची क्रांती येईल..
सावंतवाडी
महीलांनी स्वतःमधील आदीशक्ती जागृत करत कोकणचा स्वाभिमान जपण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करुन पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा.राणेंना निवडून दिल्यास विकासाची क्रांती याठिकाणी निश्चितच येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.
शहरातील वैश्य समाज सभागृहात महायुतीचा महीला मेळावा पार पडला यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते. त्याच्यासोबत व्यासपीठावर महिला जिल्हा प्रमुख अँड. निता कविटकर,भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,अजित पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, अर्चना पांगम, अनारोजिन लोबो,अन्नपूर्णा कोरगावर, संध्या तेरसे, भारती मोरे, अशोक दळवी,आदी उपस्थिथी होते.
ते म्हणाले, महीला या आदिशक्ती आदिमाया आहे ती आदिशक्ती प्रत्येकाच्या मनात आहे. ही आदिशक्ती ज्यावेळी जागृत होईल तेव्हा कोकणचा विकास होईल. अनेक योजना वेगवेगळ्या मार्गाने येत असतात. मात्र या योजना तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
आज पर्यटकांना घरगुती जेवण आवडेल या क्षेत्रात महीला आर्थिक सक्षम होऊ शकतात त्यामुळे पाच खोल्याचे हाॅटेल व्यवसाय करण्यासाठी आम्ही योजनेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करुन दिले. महिलांना सक्षम करण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळविले. महीला पायावर उभे राहील्यास निश्चितच कुटूंबाला हातभार लागतो.
ते पुढे म्हणाले, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. इथली शेती आधुनिक यंत्राद्वारे करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे राणेंना मतदान करा महीलांचे लहान लहान प्रश्न सोडविण्यासाठी गावागावातील महिलांच्या अडचणी येत्या सहा महिन्यात सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. वाद कोणाचेही होऊ शकतात भाविक भावाचे वाद होतात पण ते कुठे मिटवायचे हे आपण ठरविले पाहीजे त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
