सावंतवाडीत राणेंच्या प्रचारार्थ अबीद नाईक यांच्या बैठका…

⚡सावंतवाडी ता.०२-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये बैठका व मतदारांच्या घरोघरी गाठीभेटी घेतल्या. कोकणच्या विकासासाठी राणेंना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बांद्याचे माजी सरपंच जावेद खतीब, राष्ट्रवादी प्रदेश सचिव सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर ,जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, प्रांतिक सदस्य विलास गावकर् जिल्हा प्रतिनिधी निशिकांत कडुलकर. केदार खोत, सत्य प्रकाश गावडे आदी उपस्थित होते. नारायण राणे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. बांदा येथे राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष असलम खतीब यांच्या निवासस्थानी बैठक घेतली.

You cannot copy content of this page