सोनाळातील उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये…

⚡वैभववाडी ता.०२-: सोनाळी येथील शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी अामदार नीतेश राणे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे पक्षात अामदार नीतेश राणेंनी स्वागत केले. मुरारी शिंदे, वैभव शिंदे, मंगेश शिंदे, आनंद शिंदे, संजय शिंदे, अनंत शिंदे, सुधाकर शिंदे, दत्ताराम मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी अरविंद रावराणे, नासीर काझी, समाधान जाधव, प्रकाश शेलार, संतेश रावराणे,आदि भाजप उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page