सांगुळीवाडीतील उबाठाचे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.०२-: सांगुळवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते शशिकांत रावराणे, योगेश पांचाळ, संतोष रावराणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नीतेश राणे, नासीर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, प्रकाश पाटील, अरविंद रावराणे आदी उपस्थित होते.

ठाकरे गटाकडून कोणते विकासकामे होत नसल्याने आमदार नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. राणे यांच्या माध्यमातून सांगुळवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. गावचा विकास राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो, असा विश्वास असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page