Global Maharashtra Breaking News

महावितरण अभियंतांची तात्काळ बदली करा…

देव्या सुर्याजीं:पालकमंत्र्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महावितरण अभियंता विनोद पाटील यांच्याबद्दल वीज वितरण ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वित्त व मानवी हानी होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे स्थानिक अधिकारी आहेत‌. विनोद पाटील यांच्या बेजबाबदार पणामुळे व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे आजवर अनेक मनुष्य बळी, प्राण्यांचे बळी गेले आहेत. आजही महावितरणच्या कर्मचाऱ्यांला…

Read More

मोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष निमंत्रित…

⚡ओरोस ता.०७-:मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असून मा.नरेंद्रभाई मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवार दिनांक 09 जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी देशातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष यांना विशेष निमंत्रित केलेले आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी,सर्व खासदार आणि आमदार हे सुद्धा सदर सोहळ्याला निमंत्रित आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read More

कोलगावात ट्रक झाडाला आढळला…

नियंत्रण सुटल: चालकाला किरकोळ दुखापत.. ⚡सावंतवाडी ता.०७-: ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने साईडला असलेला झाडाला आढळून झालेल्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.ही घटना कोलगाव परिसरात घडली आहे. दरम्यान या अपघातात ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असून मात्र ट्रकचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

Read More

मडूरे दशक्रोशीसाठी सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेची शनिवारी विभागीय बैठक…

⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून वीज महावितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. गेले काही दिवस जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन जिल्हावासियांना झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना देखील याचा फटका बसून चार चार दिवस गावे अंधारात होती. वीज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल तर…

Read More

रोणापाल आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन…

रोणापाल येथील कृष्णा गावडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन.. ⚡बांदा ता.०७-: रोणापाल येथील युवा चित्रकार कृष्णा गावडे यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन रोणापाल आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोणापाल सरपंच योगिता केणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा गावडे यांच्या कलेचे कौतुक केले.     यावेळी ज्येष्ठ पत्रकार ममता चिटणीस, रोणापाल माजी सरपंच सुरेश…

Read More

अखेर ‘ती’ धोकादायक झाड तोडली…

सामाजिक बांधिलकीनी वेधले होते लक्ष; वनविभाग व प्रांतधिकाऱ्यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरासह झाराप हायवे इन्सुली मेंट, मळगाव मेट येथील रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाड तात्काळ तोडण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक बांधिलकीच्या वतीने प्रांताधिकारी व वनविभाग यांचं निवेदन देऊन लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन वनविभाग व प्रांतधिकाऱ्यांनी तात्काळ ती धोकादायक झाड…

Read More

प्रभाग २ मिळालेलं यश हे बाबू कुडतरकर यांच्यामुळे नसून हे सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच…

निशू तोरसकर यांचा पलटवार:एकट्याने श्रेय घेऊन घटकपक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर ओढवून घेऊ नये.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातून महायुतीचे उमेदवार नारायण राणें यांना सर्वाधिक मताध्यकीय हे दोन नंबर प्रभागात मिळाले त्याचे श्रेय हे निव्वळ शिंदे गटाचे अथवा बाबू कुडतरकर यांचे नसून हे यश प्रचारात सामील झालेल्या महायुतीतील सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. असा पलटवर भाजपाचे…

Read More

जल जीवन कामांची चौकशी करा…

भाजपच्या एकनाथ नाडकर्णी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ओरोस ता ७भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधील असलेली जल जीवन मिशन ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात योजनेची कामे सुरू आहेत. परंतु यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. ठेकेदार व अधिकारी यांचे योग्य नियोजन नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचा बोजवारा उडाला आहे, असे खदपूर्वक आपल्याला सांगावे लागत आहे. पाणी…

Read More

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक करणार आंदोलन…

नवीन संच मान्यतेच्या धोरणास विरोध:शिक्षक समितीचा निर्णय.. ओरोस ता.०७-: नवीन संचामान्यातेच्या धोरणा विरोधात २०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १५ जून रोजी प्राथमिक शिक्षक राज्यभर आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारा समोर सुद्धा जिल्हा शाखेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष…

Read More

ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

⚡सावंतवाडी ता.०७-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ९ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ओटवणे मांडवफातरवाडी प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व…

Read More
You cannot copy content of this page