राजन तेली: दहशतवादा विरोधात आवाज उठवणाऱ्या केसरकरांना आता हा दहशतवाद चालतो का…?
सावंतवाडी ता.१५-: माझ्या सोबत प्रचारासाठी फिरणाऱ्याना राणें कडून धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत . ते पुरावे मी एस.पी कडे देणार असून, त्यांनी तातडीने त्यांची दखल घ्यावी अन्यथा मतदारसंघातील वातावरण बिघडल्यास त्याला राणें जबाबादार राहतील असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान वारंवार दहशतवादा विरोधात आवाज उठवणाऱ्या केसरकरांना हा दशदवाद चालतो का…? असा सवाल तेली यांनी केला असून या सर्व गोष्टीला जनता माफ करणार नाही. असे तेली यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते.
श्री.तेली पुढे म्हणाले केसरकरांनी आज जर सावंतवाडी मतदारसंघाचा विकास केला तर त्यांच्या नेत्यांना गलो गल्ली फिरण्याची वेळ का आली..?असा सवाल तेली यांनी उपस्थित केला आहे. तर धमक्या देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सांगा त्या ठिकाणी आम्ही येतो असे राजन तेली यांनी राणेंना आव्हान दिले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी कोणी डगमगून जाऊ नये मी शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. असे देखील तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.
