बबन साळगावकर: केसरकरांचा पराभव ते करणारच..
⚡सावंतवाडी ता.१५-: लोकसभा निवडणुकीतील भैय्या सामंत यांच्या अपमानाचा बदला या निवडणुकीत सारस्वत समाज नक्कीच घेईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भैय्या सामंत यांना सर्वत्र फिरवून हे तुमचे लोकसभेचे उमदेवार असून, उद्याचे होणारे खासदार आहेत. अशी बतावणी दीपक केसरकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून केली होती. परंतु, ऐनवेळी पलटी मारत ते भैय्या सामंत यांच्या बाजूने उभे न राहता दुसऱ्या उमेदवारांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे हा राग सारस्वत समाजांच्या लोकांमध्ये अजून देखील आहे. तसेच भैय्या सामंत यांचा अशाप्रकारे केलेला अपमान सारस्वत समाज विसरला नाही. असे देखील मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
