भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१५-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा ‘बालदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘टेस्ट क्वेस्ट-द बाईट बॅश’ या संकल्पने अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः निरनिराळे खाद्यपदार्थ व रेसिपीज बनवल्या होत्या. त्याला सर्व मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलांनी मुलांसाठी बनवलेल्या चविष्ट पदार्थांची रेलचेल सर्वत्र दिसत होती. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजून गेल्याने वातावरण उत्साही व आनंदी बनले होते.

कार्यक्रमाला शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, सर्व शिक्षक तसेच पालक वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page