मंत्री दीपक केसरकर:बांद्यातील विकासकामांसोबत आपण गंभीर असून विशेष सभा घेऊन येथील प्रश्न सोडविण्यावर..
⚡बांदा ता.१७-: तासातासाला पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांच्या तोंडी निष्ठेच्या गोष्टी शोभत नाहीत. माजी आमदार शिवराम दळवी यांचे आंबोलीतील हॉटेल फोडण्यात तेली हे सर्वात पूढे होते. त्यामुळे ते यावेळी नक्कीच पराभवाची हॅट्ट्रिक करतील अशी टीका महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथे केली.
येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात श्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भाजप युवा मोर्चाचे लखमराजे भोसले, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, बाळा गावडे आदिसह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र यावे. जे कोणी अपक्ष उमेदवारांना मदत करत असतील त्यांना सोबत बोलावून घ्या. विकास काय असतो हे मी पालकमंत्री असताना मुंबई व कोल्हापूर येथे जाऊन पाहा. मी कोणत्याही कामात आतापर्यंत एकही रुपया घेतलेला नाही. नेहमीच विकासासाठी जिल्ह्याचा विचार केला.
अर्चना घारे या सावंतवाडी मसतदारसंघात नवीन आहेत. त्यांना इथल्या समस्यांची जाण नाही. विशाल परब हा केवळ फुगा आहे. उद्या त्यांची ईडी चौकशी झाल्यास त्यांच्यासोबत फिरणारे पण अडचणीत येतील. बांद्यातील विकासकामांसोबत आपण गंभीर असून विशेष सभा घेऊन येथील प्रश्न सोडविण्यावर प्राधान्य देण्यात येईल.
यावेळी लखमराजे भोसले, प्रमोद कामत, श्वेता कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दादू कविटकर यांनी केले. आभार उपसरपंच बाळु सावंत यांनी मानले.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरु सावंत, मकरंद तोरसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, निलेश कदम, गुरु कल्याणकर, सिद्धेश पावसकर, सिद्धेश महाजन, भाऊ वाळके, सागर सावंत, दीपक सावंत, अर्चना पांगम आदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
