रेडकर हॉस्पिटलमधील आरोग्य शिबिरात ३५ जणांची तपासणी…

मालवण ( प्रतिनिधी )

मालवण येथील रेडकर हॉस्पिटल व लायन्स क्लब मालवण यांच्यातर्फे रेडकर हॉस्पिटल येथे आयोजित मोफत मधुमेह व ह्रदयरोग तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यार शिबिरात ३५ जणांची तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी स्व. राजन गावकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. रेडकर यांच्यासमवेत लायन्स क्लबच्या खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर, लायन्स क्लबचे पदाधिकारी गणेश प्रभूलकर, जयश्री हडकर, उमेश शिरोडकर, डॉ. दर्शन खानोलकर, दुर्गेश गावकर, श्रीमती महाडिक, डॉ. धनंजय सावंत आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी डॉ विवेक रेडकर यांनी रेडकर हॉस्पिटल तर्फे नेहमीच आरोग्य शिबीरे आयोजित केली जात आहेत. नागरिकांनी अनुवंशीक आजारांकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, गरजू व्यक्तींच्या तपासणी व उपचारासाठी आवश्यक ते सहकार्य रेडकर हॉस्पिटल कडून केले जाईल, असेही डॉ. रेडकर म्हणाले. तर यावेळी गणेश प्रभुलकर यांनी रेडकर हॉस्पिटलच्या आरोग्य विषयक उपक्रमाना लायन्स क्लबचे नेहमीच सहकार्य लाभेल, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रथमेश कोळगे यांनी केले.

या शिबिरात मधुमेह – ब्लड शुगर तपासणी, हृदयरोग तपासणी, जनरल चेकअप, आदी तपासणी करण्यात आली. तसेच तद्य डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page