मंत्री दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट: कोणी विकास कामांच श्रेय घेऊ नये,सर्व काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर,तेलींना टोला..
⚡सावंतवाडी ता.१५-: महेश सारंग मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत येणार होते. परंतु काही अडथळा निर्माण झाल्याने ते येऊ शकले नाहीत नाहीतर आज जी भाजपची संघटना गावागावात दिसते ती शिवसेनेची दिसली असती असा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथे केला.दरम्यान काही लोक विकास कामाचा श्रेय घेत आहेत परंतु त्यांना श्रेय घेण्याचा कोणताही आधिकार नाही. कारण विकास कामे ही पालकमंत्री, खासदार किंवा मंत्री असल्याने होतात, त्यामुळे उगाच कोणी लोकांची दिशाभुल करू नये असा टोला त्यांनी राजन तेली यांना लगावला.
ते पुढे म्हणाले की ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे वाईट प्रवृत्ती येऊ नये याची आता तुम्ही सर्वांनी दक्षता घेतले पाहिजे आज काही लोक पैशाच्या जीवावर निवडणुका लढून जनतेला मोठे मोठे अमिष दाखवत आहेत अशा लोकांना तुम्ही आता जागा दाखवली पाहिजे,असे केसरकर यांनी उपस्थितांना आवाहन केले.