⚡कुडाळ, ता.२१-: श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री शंताराम भाऊ कदम तसेच खजिनदार मा. श्री नंदकुमार राठे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष मा. श्री दिलीपजी भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.
जयंतीनिमित्त आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील परिट समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री सदानंद अणवकर यांनी केले आहे.
