कोचरा ग्रामपंचायतच्या वतीने म्हापण -परुळे नवनिर्वाचित जि. प., पं. स. सदस्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२१-: नुकत्याच झालेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीत म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीने वर्चस्व राखले. यामधील तिन्ही नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांचा कोचरा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, म्हापण पं. स. सदस्य विष्णू फणसेकर व परुळे पं. स. सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई यांचा कोचरा सरपंच योगेश तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रामपंचायत अधिकारी सौरभ राऊळ, ग्रा. पं. सदस्य अनिल सुतार, विशाल वेंगुर्लेकर, प्रगती राऊळ, सौ. परब, संजय गोसावी, गणपत गोसावी, बाबा शिरोडकर, तलाठी सायली आंदुर्लेकर, कोचरा पोलीसपाटील सौ. गोसावी, मायना पोलीसपाटील सौ. दळवी, शिवसेना विभागप्रमुख देवदत्त साळगावकर, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page