महेश सारंग: कोलगाव जिल्हा परिषदेतून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा सर्वांनी निर्धार करा..
सावंतवाडी ता.१५-: कोलगाव गावात काही अदृश्य शक्ती रात्रीच्या वेळी फिरत आहेत. लोकांनी या लोकांपासून सावध राहावे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये मंत्री दीपक केसरकर यांना आपण कोलगाव गावातून मताधिक्य द्यायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवा असे आव्हान भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी आज येथे केले.
दरम्यान कामे मंजूर केली म्हणून होत नाहीत. ती कामे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शिफारस होतात त्यामुळे कोणी त्यांचे श्रेय घेऊ नये असा टोला देखील त्यांनी यावेळी राजन तेली यांना हाणला. तर काहीजण पैशाच्या जीवावर मोठमोठी आमिष दाखवत आहेत. अशा लोकांना गावात थारा देऊ नका असे आवाहन देखील महेश सारंग यांनी गावकऱ्यांना यावेळी केले.