जनसामान्यांचा नेता म्हणजे पुष्पसेन सावंत..

उमेश गाळवणकर:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ‘नानां’ना सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली..

⚡कुडाळ ता.२१-: कै पुष्पसेन सावंत म्हणजे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा नेता ! समाजकारणावर श्रद्धा ठेवून राजकारण करणारे आमदार म्हणून ते सुपरीचीत आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून काम करणे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. असे उद्गार बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळवणकर यांनी काढले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कै. पुष्पसेन सावंत यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना बोलत ते होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये पुष्पसेन सावंत यांचे दिलदार, धाडसी नेतृत्व व समाजवादावर त्यांची असलेली श्रद्धा, सुधारित शेतकरी, याविषयी विवेचन केले. व त्यांच्या आयुष्यातील धाडसी प्रसंग उपस्थितांसमोर कथन केले.
माजी आमदार कै पुष्पसेन सावंत यांच्या कार्याची ओळख आजच्या तरुण पिढीला व्हावी व त्यांनी जे काही आदर्श आपल्यासमोर ठेवले आहेत, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आजच्या तरुण पिढीने करावा. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्यांचे विचार त्यांचे आदर्श, त्यांचं लोकोत्तर कार्य याचे सतत स्मरण व्हावे या उद्देशाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये त्यांना त्यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उमेश गाळवणकर यांच्यासह प्रा अरुण मर्गज, शांभवी मार्गी -आजगावकर, अश्विनी पालव, मानसी धुरी, संगीता आकेरकर व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
जनसामान्यांचे कैवारी पुष्पसेन सावंत हे महाराष्ट्रातील एक समाजवादी विचाराने भारावलेले प्रसिद्ध राजकारणी आणि समाजसेवक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जनता दल, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामार्फत राजकारण व समाजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना जनसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जात होते. जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
प्रा.अरुण मर्गज यानी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिलदार, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, तसेच एक ट्रक ड्रायव्हर ते आमदार या पर्यंत त्यांच्या समाजकारणी, राजकारणी, प्रगतशील शेतकरी, शिक्षण संस्था चालक व जनसामान्यांचा धाडसी नेता या ऊर्जस्वल प्रवासाची उपस्थितांना आठवण करून दिली.

You cannot copy content of this page