कुणकेरीत ८ मार्चला वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सव…

⚡सावंतवाडी ता.२१-: तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळ्या व वैशिष्टपूर्ण हुडोत्सव रविवारी ८ मार्चला होत आहे. १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यानिमित्ताने होते.

या उत्सवानिमित्त विविध परंपरागत कार्यक्रम पार पडतात. हुडोत्सवाचा मुख्य दिवशी भावई देवीच्या निवासस्थानी देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी रोंबाट तर
आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेटीसह कोलगाव सिमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिरकडे येणार आहेत. सायंकाळी हुड्याजवळ घोडेमोडणी व लूटूपुटूचा खेळ होणार असून १०० फुटी हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी हुडोत्सवाचा आणि श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक देवस्थान समिती आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे

You cannot copy content of this page