⚡दोडामार्ग ता.१५-: दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व्ही जे एन टी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन दीपक केसरकर यांचा प्रचार केला जात असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे दीपक केसरकर भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत जे एन टी सेल तालुकाध्यक्ष विशाल जाधव व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून दोडामार्गात मंत्री केसरकर यांचा जोरदार प्रचार सुरू…
