मंत्री दीपक केसरकर: किती मतांनी निवडून येण्यापेक्षा विजयी होणे फार महत्त्वाचे,तर मळगाव येथील ठाकरे सेनेचे उपविभाग प्रमुख महेश शिरोडकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश..
⚡सावंतवाडी ता.१६-: राजन तेली यांना समोर पराभव दिसू लागल्याने ते अशा प्रकारची विधाने करत सुटले आहेत, त्यामुळे त्यावर कोणीही लक्ष देऊ नये. असा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान मोठ्या लोकांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते त्यामुळे ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. खर तर राजन तेली हे इतर मतदारसंघातून आलेले आहेत. त्यामुळे ही संस्कृती त्यांचीच आहे असे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले मी कधीही अदानीला भेटलो नाही त्यामुळे येथे येऊन नाहक बदनामी उद्धव ठाकरे यांनी करू नये मायनिंग प्रकल्प हा पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेला आहे त्या प्रकल्पामुळे अनेकांचा रोजगार मिळतो त्यामुळे चांगल्या प्रकल्पाला विरोध करणं हे अत्यंत चुकीचे आहे असे केसरकर यांनी सांगितले तर मी किती मताधिक्याने विजयी होईन यापेक्षा विजयी होणे हे फार महत्त्वाचे आहे असे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. तर प्रवीण भोसले यांनी केलेला पंधरा वर्षांपूर्वी चा आरोप हा एक विनोदच आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी मळगाव येथील ठाकरे सेनेचे उपविभाग प्रमुख महेश शिरूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.