सावंतवाडीत शिवसेनेचे आंदोलन, राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्याचा निषेध..

⚡सावंतवाडी ता.२१-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सावंतवाडीत शिवसैनिकांनी कॉग्रेस नेते राहुल गांधींचा पुतळा जाळला. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. अमेरीका आणि भारत करारावर व पंतप्रधान मोदींबाबत वापरलेल्या अपशब्दांचा निषेध म्हणून आम्ही पुतळ्याचे दहन करत असल्याचे विधान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.

श्री. परब म्हणाले, भारत-अमेरिका व्यापार करार आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केल्याच्या तसेच अपशब्द वापरल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निषेधार्ह शिवसेना आक्रमक झाली आहे. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोर शिवसेनेच्यावतीने कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळा जाळण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, लतिका सिंग, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, रियाज खान आदींसह शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page