⚡बांदा ता.२१-: छत्रपती शिवराय हे महान योद्धा असण्याबरोबरच स्वराज्याचे संस्थापक, तसेच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर समस्त भारतवर्षाच्या इतिहासात शिवरायांचे जीवन देदिप्यमान व अनन्यसाधारण ठरणारे आहे. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारे शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा नं. १ च्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात श्री कामत बोलत होते. याठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्या प्रियांका देसाई, वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक गुणेश गवस, डॉ. भक्ती महाजन-आळवे, ऍड. चैतन्या सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, घारपी प्रशाळेचे मुख्याध्यापक जे डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री कामत, सौ. ऋतिका नाईक, प्रियांका देसाई, रत्नाकर आगलावे यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळी पारंपारीक पद्धतीने व पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने गेल्या आठ दिवसात शालेय, महाविद्यालयीन गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
अंगणवाडी गट (प्रथम पाच क्रमांक)- राज उमेश सावंत, अन्विता अनंत वालावलकर (अंगणवाडी मोरगाव), अद्विक संजोग जाधव (सावंतवाडी), साईरा शैलेश लाड (अंगणवाडी निमाजगा), वीरेन लक्ष्मण चौगुले.
पहिली ते तिसरी गट- सार्थक घनश्याम वालावलकर (सावंतवाडी), देवांशी रघुनाथ बहिरे, अन्वी आशिष माळकर (इन्सुली), गार्गी शंकर निब्रे (पीएमश्री बांदा नंबर 1), स्वरा संतोष कदम (मोरगाव नं 1).
चौथी ते सहावी गट- सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (पीएमश्री बांदा नं 1), दुर्वा दत्ताराम नाटेकर (दिव्य ज्योती स्कुल बांदा), तनिष्का संदीप देसाई (साई विद्या मंदिर), वेदांत लक्ष्मण चौगुले (पीएमश्री बांदा नं 1), परिधी प्रसाद वायंगणकर (होली क्रॉस हायस्कूल).
सातवी ते दहावी गट- मृदुला नाना सावंत (दिव्य ज्योती बांदा), नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कूल बांदा) दिक्षा शामसुंदर वरक (खेमराज हायस्कूल बांदा), रुषदा रोहिदास देसाई-कळंगुटकर (दिव्य ज्योती बांदा), भाविका भादू धुरी
(इन्सुली).
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र आठलेकर व जे डी पाटील यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, संकेत वेंगुर्लेकर, भूषण सावंत, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, अनुप बांदेकर, ओंकार हळदणकर, कांता हळदणकर, तनिष मेस्त्री, सूर्यकांत चव्हाण, रुपेश सावंत, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर, तात्या स्वार, सौ. रीना मोरजकर, वेदिका गावडे, सौ. स्वाती पाटील, वैदेही वाडकर, रोट्रॅकचे अध्यक्ष रोहन कुबडे, मयूर मसुरकर, नेहा निगुडकर, दिया गायतोंडे, ओंकार पावसकर, दत्तराज चिंदरकर आदी उपस्थित होते.
बांदा येथे श्री स्वराज्य प्रतिष्ठानचा भव्य शिवजन्मोत्सव उत्साहात…
