Headlines

शिवडाव माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी व रिंगण सोहळा उत्साहात

कणकवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिवडाव माध्यमिक विद्यालयात भक्तिमय वातावरणात वृक्षदिंडी, रिंगण सोहळा आणि अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संत परंपरेचा वारसा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा साकारत दिंडीत सहभाग घेतला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या गजरात परिसर भक्तिमय झाला. दिंडीदरम्यान “लझाडे लावा, झाडे जगवा हा पर्यावरण जनजागृतीचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेचा अनुभव उपस्थितांना दिला. पुढे झालेल्या अभंगवाणी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संतांच्या अभंगांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य चंद्रकांत शिरसाट, मुख्याध्यापक मुकेश पवार तसेच रिया गोसावी, गणेश वर्पे, स्वप्निल तांबे, विक्रम मुंबरकर, नुजहत पटेल आणि भाग्यश्री पताडे उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अध्यात्म, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

You cannot copy content of this page