कुडाळ : शहरातील गणेशनगर येथील सौ.तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय वर्षे ३६) या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने पंख्याला घळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार संजय विष्णू कुडाळकर (वय वर्षे ५१ गणेश नगर कुडाळ), यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात केली आहे.
सौ.तन्वी कुडाळकर हिला दोन मुलगे, पती सिद्धिविनायक कुडाळकर, एक दीर, भावजय असा परिवार आहे. सौ.तन्वी हिने आत्महत्या केल्याची समजताच गणेशनगर सह कुडाळ शहरात नागरिकांकडुन हळवळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या झाल्याची खबर मिळताच सकाळी ९.१५ वाजता कुडाळ पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमची कडी आतील बाजूने उघडलेली होती. तन्वीची आत्महत्या राहत्या घरी रविवारी २६ जुलै रात्रौ ११ ते, सोमवार २७ जुलै सकाळी ८ वाजे दरम्यान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सौ.तन्वी कुडाळकर ही तिचे पती सिद्धिविनायक कुडाळकर यांच्या सोबत कासारटका देवस्थान येथे स्नेहभोजना साठी गेली होती. त्या नंतर स्नेहभोजन झाल्यानंतर सायंकाळी परत घरी आली होती. त्यामुळे तन्वीच्या बाबतीत नक्की आत्महत्या? की,अजुन काही? ते, अजुन स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री.अवताडे करत आहेत.
कुडाळ येथील महिलेची ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या
