सावंतवाडी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही साई पालखी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री साई पालखीचे आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथील निवासस्थानी आगमन होणार आहे. त्यानंतर आमदार दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते साई पालखीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.
या पूजन सोहळ्यास सर्व कार्यकर्ते व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
तसेच बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री साई पालखी माडखोलकडे रवाना होणार आहे. या पालखी सोहळ्यातही सर्व साईभक्तांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
