Headlines

वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही…

महाविकास आघाडीसह घटक पक्ष आक्रमक: अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब.. ⚡सावंतवाडी ता.२८-: वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही ग्राहकांच्या परवानगीशिवाय कुठलेही मीटर बसवता कामा नये,तसेच बसवण्यात आलेले मीटर तात्काळ काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आज येते महाविकास आघाडीचे घटक पक्षातील पदाधिकारी व ग्राहकांनी वीज कंपनीचे अधिकारी शैलेश राक्षे यांच्याकडे…

Read Full News

घुमडे येथील घुमडाई मंदिरात श्रावणधारा भजन महोत्सव…

⚡मालवण ता.२८-:घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजनमहर्षी ‘कै. पंढरीनाथ घाडीगावकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव होणार आहे. यावर्षी या महोत्सवाचे ११ वे वर्ष आहे. यामध्ये मंगळवार २९ जुलैला सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्री सद्गुरू संगीत भजन मंडळ,…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्यअधिकारी द्या…

अन्यथा आंदोलन करावा लागेल: बबन साळगावकर यांचा इशारा, पालकमंत्र्यांनी ही लक्ष देण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावा लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला.यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील लक्ष घालावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. ते पुढे म्हणाले एक…

Read Full News

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार…!

⚡सावंतवाडी ता.२७-:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज सावंतवाडी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंबावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गणेश चतुर्थी जवळ आली असतानाही अद्याप अकरावीचे वर्ग सुरू झाले नसल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाच्या अनास्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.बाबुराव धुरी यांनी आपल्या भाषणात, उद्धव ठाकरे…

Read Full News

कोमसापच्या कणकवली अध्यक्षपदी माधव कदम;तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर…

⚡कणकवली ता.२७-: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. कोमसापच्या कणकवली शाखेच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल सभागृहात झाली. यासभेत कणकवली शाखेच्या कार्यकारी मंडळाची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून…

Read Full News

स्वतःचे अपयश लपवण्यासाठी मोंडकर व तोरसकर यांच्याकडून दत्ता सामंत यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये…

शिवसेना पदाधिकऱ्यांची टीका:बाबा मोंडकर यांच्या सारख्या स्वयंघोषित राष्ट्रीय नेत्यांना हा विकास कधी समजला नाही.. ⚡मालवण ता.२७-: शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत असल्याने भाजपचे बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर यांच्या सारखे स्वयंघोषित नेते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सामंत यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. मात्र यापुढे दत्ता सामंत यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न झाल्यास बाबा मोंडकर यांनी…

Read Full News

मनीष दळवी यांचा डेगवे येथील स्थापेश्वर विकास सोसायटीच्या वतीने सत्कार…!

⚡बांदा ता.२७-: वैकुंठभाई मेहता हा महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळाल्याने बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा डेगवे येथील स्थापेश्वर विकास सोसायटीच्या वतीने चेअरमन प्रवीण देसाई, सरपंच राजन देसाई यांनी ओरोस येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी डेगवेचे माजी सरपंच मधु देसाई,…

Read Full News

देशहित जपणारा प्रत्येक जण सैनिकच…

सुभेदार मेजर संजय सावंत:बांदा खेमराज प्रशालेत कारगिल विजय दिन उत्साहात साजरा.. ⚡बांदा ता.२७-: ज्या देशात आपण राहतो त्या मातृभूमीचे आपण देणं लागतो. प्रत्येकाने राष्ट्रहिताचा विचार प्रथम केला पाहिजे. त्यानंतर आपलं हित पाहिलं पाहिजे. देश माझ्यासाठी नव्हे, तर मी देशासाठी आहे हा विचार मनात बिंबवला पाहिजे. घराघरात आई जिजाऊ व तिच्या शिकवणीने छत्रपती शिवराय घडले पाहिजेत.केवळ…

Read Full News

रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परमकर्तव्य…

अजयराज वराडकर:कौशल्य अभ्यासक्रम (MSFC) प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.२७-:आज शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेऊन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने कट्टा परिसर व दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर व्यावसायिक कौशल्य असणारे शिक्षण देऊन स्वावलंबी बनवू असा निर्धार बाळगला होता. हा निर्धार आज साध्य होताना दिसत असून रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे…

Read Full News

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची आज सांगता नसून ही नवी सुरुवात आहे…

श्री. अच्युत भोसले – सावंत:सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न.. ⚡मालवण ता.२७-:आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे आणि पालक मुलांच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळांकडे वळत असल्यामुळे मुलांमध्ये नविन्याची कमतरता दिसून येते. आजची पिढी मितभाषी झाली असून आपल्या भावना मांडू शकत नाही. मात्र भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांमधील नाविन्याला व गुणांना वाव देणारी शिक्षणसंस्था आहे, त्यामुळे…

Read Full News

You cannot copy content of this page