महाविकास आघाडीसह घटक पक्ष आक्रमक: अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब..
⚡सावंतवाडी ता.२८-: वीज कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही ग्राहकांच्या परवानगीशिवाय कुठलेही मीटर बसवता कामा नये,तसेच बसवण्यात आलेले मीटर तात्काळ काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आज येते महाविकास आघाडीचे घटक पक्षातील पदाधिकारी व ग्राहकांनी वीज कंपनीचे अधिकारी शैलेश राक्षे यांच्याकडे केली.
दरम्यान नव्याने स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानंतर संबंधित ग्राहकांना दुप्पट बिल आल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. खाजगी कंपनीकडून भल्यासाठी लोकांना आर्थिक भुर्दंड नको,अशी सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. येथील ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीचे तसेच घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व ग्राहकांनी वीज कंपनीचे अधिकारी श्री राक्षे यांना घेराव घालत जाब विचारला.