⚡मालवण ता.२८-:
घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजनमहर्षी ‘कै. पंढरीनाथ घाडीगावकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव होणार आहे. यावर्षी या महोत्सवाचे ११ वे वर्ष आहे.
यामध्ये मंगळवार २९ जुलैला सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्री सद्गुरू संगीत भजन मंडळ, कुडाळ (बुवा – वैभव सावंत), रात्री ८.३० वाजता श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, परेल मुंबई (बुवा – दुर्वास गुरव) मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल वेंगुर्ले (बुवा – रुपेंद्र परब), रात्री ८.३० वाजता श्री लिंग माऊली प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रुझ मुंबई (बुवा – श्रीधर मुणगेकर). गुरुवार, ७ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता संयुक्त दशावतारांचा संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग ‘काशी भविष्यकथन’ हा सादर होणार आहे. मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. श्री भूतनाथ प्रासादिक भजनमंडळ, वायरी मालवण (बुवा – भालचंद्र केळुसकर), रात्री ८.३० वा. श्री प्रासादिक भजन मंडळ, भांडुप मुंबई (बुवा- भागवान लोकरे). १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. लघुरुद्र दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. संयुक्त दशावतारांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘कालचक्र’ सादर होणार आहे.
मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायं. ७ वा. श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके), रात्रौ ८.३० वा. श्री गंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घाटकोपर मुंबई, (बुवा लक्ष्मण गुरव) यांची भजन सेवा होणार आहे. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ, घुमडे-मालवण यांनी केले आहे.