अन्यथा आंदोलन करावा लागेल: बबन साळगावकर यांचा इशारा, पालकमंत्र्यांनी ही लक्ष देण्याची केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावा लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला.यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील लक्ष घालावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
ते पुढे म्हणाले एक नाही धड भाराभर चिंध्या अशी अवस्था सावंतवाडी नगरपालिका विकास कामाची झालेली आहे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे प्रशासनावरती कुणाचाही नियंत्रण राहिलेलं नाही प्रत्येक अधिकारी मुख्याधिकारी सारखे वागत आहेत स्वच्छतेचे तीन तेरा वाजवले पाण्यावरती अशमय दुर्लक्ष स्ट्रीडलाईटच्या प्रचंड तक्रारी आहेत रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत याच वर्षी एप्रिल मे महिन्यामध्ये केलेले असते वाहून गेले आहेत शहरातील चौका चौकात रस्त्याच्या कडेला कचरा पसरलेला दिसत आहे लाडाची बाग डम्पिंग ग्राउंड ची अवस्था भयानक झाली असून दुर्गंधी पसरली आहे पार्किंगची अवस्था भयानक आहे रस्त्याच्या कडेला वाढलेलं रान तसंच वाढत आहे काँक्रीटच्या बोळ रस्ते ठिकठिकाणी नागरिक पडत आहेत सदर रस्ते निसरडे झाले आहेत प्रशासनाच्या बैठका कुणी घेत नाहीत कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण नाही बांधकाम खाते आरोग्य खाते पाणीपुरवठा खाते सुसेगात चालले आहे सगळीकडे कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे यावरती आवर घालण्यासाठी सक्षम मुख्याधिकारी सावंतवाडी मध्ये कायमस्वरूपी नेमा अन्यथा माजी नगरसेवकांना व नागरिकांना 15 ऑगस्ट ला आंदोलन करावा लागेल असा इशारा त्यांनी यावे दिला आहे.